हात जोडून प्रार्थन करेन...; कथित MMS लीक होण्यावर अभिनेत्री संतापली!

पाहा काय म्हणाली अभिनेत्री 

Updated: Oct 9, 2022, 10:39 AM IST
हात जोडून प्रार्थन करेन...; कथित MMS लीक होण्यावर अभिनेत्री संतापली! title=

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अक्षरा एका कथित MMS मुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावरही त्या व्हिडिओबाबत अनेक बातम्या येत आहेत. व्हिडिओमध्ये अक्षरा सिंह दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात आला. आता या सगळ्यावर एक व्हिडीओ शेअर करत अक्षरानं सोशल मीडिया यूजर्सला खडसावले. 

आणखी वाचा : करण जोहरबाबत शाहरुख खानचं मोठ वक्तव्य; 'होय, आम्ही एकत्र...'

अक्षरानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षरानं व्हिडीओत फेक व्हिडीओ पसरवणाऱ्या यूट्यूबर्सना चांगलेच सुनावले आहे. व्हिडिओ पोस्ट करत अक्षरा म्हणाली, 'तुम्ही जे करत आहात त्यानं तुम्हालाच नुकसान होणार आहे. मला काही वाटणार नाही आणि तुम्हाला घाबरून मी लाइव्ह नाही आले. सामान्य मुलींना या गोष्टींचा त्रास होऊ नये, त्यांच्यावर या गोष्टीचा परिणाम होऊ नये म्हणून मी लाइव्ह आले. शेरावलीचा जल्लोष.

आणखी वाचा : 'या' अभिनेत्रींनी ऑनस्क्रीन बाप - बेटा दोघांसोबत केला रोमान्स, यादीतील चौथ्या क्रमांकाचं नाव वाचून व्हाल आवाक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Gauri Khan च्या भावानं Shahrukh Khan वर रोखली बंदूक!

व्हिडिओमध्ये, अक्षरा म्हटली की असे काही YouTubers आहेत, जे असे व्हिडिओ पसरवत आहेत, ज्यांचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. जिथे काहीही खरं नाही. तुम्ही त्याला अशा प्रकारे समाजात पसरवाल. हे करत तुम्ही माझ्यासाठी वाईट करत आहात असं नाही. तुम्ही येणाऱ्या काळातल्या आई, बहिणी आणि मुलींसाठी वाईट करत आहात. कारण आपल्याला कर्माची फळं मिळतात. (Akshara Singh Speaks Up On Alleged Leaked Mms Gives Befitting Reply To Youtubers) 

आणखी वाचा : Kareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत 'हे' सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock

कोणाबद्दलही काहीही बोलणे किंवा लिहिणे तुम्हाला सोपे जाईल, असे त्याने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे. कारण कोणाच्या तरी इज्जतीचा लिलाव करून तुम्ही युट्युब वरून काही पैसे कमवू शकता, पण तुमच्या कुटुंबाला या ठिकाणी ठेवा आणि विचार करा, कारण मला काही फरक पडणार नाही. तुम्ही माझी प्रतिमा खराब कराल. माझ्या इतक्या दिवसांची मेहनत वाया घालवाल असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही हे करू शकत नाही. हे असे लोक आहेत जे काही पैशांसाठी त्यांची आई, बहिण आणि मुलीची इज्जतही विकू शकतात.  पण तुमच्यासोबत काही वाईट होऊ नये याची मी प्रार्थना करेन. 

आणखी वाचा : 'मला एकदा तिनं इतकं मारलं की...', जया बच्चन यांच्या रागामुळे लेकिच्या मनात भलतीच दहशत

अक्षरा पुढे म्हणाली, 'दोन्ही बाजू जाणून न घेता असे काही पसरवणे चुकीचे आहे. ती कोणाला घाबरत नाही कारण ती खंबीर आहे. पण विचार करा समाजातील त्या मुली ज्या सर्वसामान्य आहेत, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. हा अतिशय संवेदनशील विषय आहे.' अक्षरा सिंह पुढे म्हणाली की, 'अशा बातम्या पसरवणार्‍या मानसिक आजारी लोकांसाठी ती प्रार्थना करेन, त्यांना सद्बुद्धी मिळावी.'