मुंबई : दाक्षिणात्य  अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. प्रिया प्रकाश वारियरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना तिच्या नवीन चित्रपटाची माहिती दिली आहे. प्रिया प्रकाश वारियर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय कलाकारांपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रिया प्रकाश वारियरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या भावना दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रिया प्रकाश वारियरच्या पुढील चित्रपटाशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये ती अनेक ठिकाणी हसत आहे आणि अनेक ठिकाणी उदासही दिसत आहे. पण प्रिया प्रकाश वारियर तिच्या सर्व लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने चित्रपटाचं नावंही सांगितलं आहे. प्रिया प्रकाश वारियरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मेरी अगली गायत्री.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रिया प्रकाश वारियरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. प्रिया प्रकाश वारियरचे अनेक चाहते व्हिडिओमध्ये  कमेंट करत आहेत आणि तिचं कौतुकही करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं की, मी तुझ्यावर प्रेम करतो. तर आणखी एकाने लिहिलं की, मी या चित्रपटाची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे. तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिलं, 'तू नेहमीच सुंदर दिसतेस.' या व्यतिरिक्त इतर चाहत्यांनी प्रिया प्रकाश वारियरच्या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.