मुंबई : बॉलिवूड एक्शन स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक दिवसांपासून अफेअरच्या चर्चा सुरु असताना अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सगळ्यांना मोठा धक्का बसला. जवळ-जवळ 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर टायगर श्रॉफ आणि दिशी पटाणी वेगळे झाले. मात्र या दोघांनी कधीच आपलं नातं सार्वजनिक केलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. चर्चा आहे की, टायगर सध्या बॉलिवूड अभिनेत्री आकांशा शर्माला डेट करत आहे. आकांशा शर्मा आणि त्याच्या अफवांवर नुकताच त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता, यावर अभिनेत्याने उत्तर देत म्हटलं की, हे खोटं आहे. मात्र बॉलिवूड जगतात टायगर आणि आकांक्षा शर्माच्या डेटिंगच्या चर्चा सर्वत्र आहेत. 


आकांक्षा शर्माच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने महेश बाबू, कार्थी आणि वरुण धवनसोबत बऱ्याच लोकप्रिय स्टारसोबत काम केलं आहे. 
आकांक्षाने २०२०मध्ये साऊथ सिनेमा 'त्रिविक्र'मधून डेब्यू केला. गेल्यावर्षी टायगर श्रॉफचा म्युझिक व्हिडिओ 'केसोनोवा' रिलीज झाला. ज्यामध्ये ती दिसली होती. 



आकांक्षा शर्माने टायगरसोबत 'डिस्को डान्सर' म्यूझिक व्हिडिओमध्येही काम केलं आहे. आकांक्षा या व्यतिरिक्त बऱ्याच म्यूझिक व्हिडिओ मध्ये दिसली आहे. बादशाहचं हिट पार्टी साँन्ग 'जुगनू'मध्येही आकांक्षा शर्माने परफॉर्म केलं आहे. याशिवाय आकांक्षा शर्मा साऊथ इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच आयटम साँन्गवर थिरकली आहे.