Boycott Trend in Bollywood Continues: बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला. रिलिजपुर्वीच या चित्रपटाचे #boycottlaalsinghchaddha #boycottbollywood असे ट्रेण्ड सोशल मीडियावर फिरू लागले होते. सगळीकडून हा विरोध चित्रपटाच्या रिलिजनंतरही जोर धरू लागला होता. त्यामुळे या सगळ्या विरोधाचा परिणाम आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'वरही झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार चांगली कमाई करू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या विरोधानंतर बॉलिवूडच्या किंग खानलाही या बॉयकोट ट्रेण्डचा फटाका बसला. आमिरनंतर लगेचच शाहरूख खानच्या 'पठान' या चित्रपटालाही बॉयकोट करण्यात यावे अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली असताना आता सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटाला बॉयकोटचा फटका सहन करावा लागतोय. आमिर पाठोपाठ शाहरूख खान, सलमान खानही आता प्रेक्षकांच्या boycott यादीत आले आहेत. 


सलमानचा 'टायगर 3' हा चित्रपट तिसरा सिक्वल आहे. याआधी 2012 साली सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2017 साली 'टायगर जिंदा हैं' हा चित्रपटाचा दुसरा सिक्वल प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तेव्हा आता 'टायगर 3' येत असला तरी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होतं आहे. 


'टायगर 3' हा चित्रपट 21 एप्रिल 2023 ला प्रदर्शित होतो आहे तसेच शाहरूखचेही दोन चित्रपट 'जवान' आणि 'पठान' पुढच्याच वर्षी रिलिझ होण्याच्या तयारीत आहेत. परंतु चित्रपट रिलिझ होण्याच्या कित्येक महिन्यांआधीच दोघांचेही चित्रपट प्रेक्षकांना नकोसे झाले आहेत. आता या बॉयकोटचा परिणाम सलमान खान आणि शाहरूखच्या चित्रपटावर कसा होईल हे आता येणार काळच ठरवेल परंतु बॉयकोटच्या ट्रेण्डमुळे 'लाल सिंग चड्ढा' हा सुपरफ्लॉप ठरल्याचे जाणवतं आहे.