मुंबई : कोरोनाचा धसका साऱ्या जगाने घेतलाय. याला कोणीच अपवाद राहीलं नाहीय. कोरोनाने सर्वसामान्यातून हळूहळू बॉलिवुडमध्ये प्रवेश केलाय. बीग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवाराला कोरोनाची लागण झाली. दरम्यान अभिनेत्री रेखाचा बंगला देखील कोरोनाच्या काळजीने सील करण्यात आलाय. इतकी काळजी घेऊनही कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो हे पाहून बॉलिवुडकर सतर्क झाले आहेत. शाहरुखने देखील स्वत:च्या बंगल्यापासून सुरक्षिततेची काळजी घेण्यास सुरुवात केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखने त्याच्या मन्नत बंगल्याला चारही बाजुंनी प्लास्टिकचं आवरण घातलंय. या बंगल्यात शाहरुख, पत्नी गौरी आणि तीन मुलांसोबत राहतो. त्याने आपलं ५ माळ्याचं ऑफीस कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिलंय. 


दोन वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख राजकुमार हिरानीच्या सोशल ड्रामावर आधारित सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणारेय. लॉकडाऊन किंवा अनलॉकमुळे अडचणी आल्या नाहीत तर यावर्षी ऑक्टोबरमध्ये या सिनेमाचं शूटींग सुरु होण्याची शक्यता आहे. सिनेमाची रेकी सुरु करण्यास तसेच प्री प्रोडक्शन काम सुरु करण्यास त्याने सांगितलय. सध्या कोरोना काळात ऑक्टोबर आधी शूट सुरु करण्यास किंग खान तयार नाहीय.


दरम्यान या काळात शाहरुखने २० हून अधिक सिनेमांच्या कहाण्या वाचल्या असून तो सिनेनिर्मात्यांच्या संपर्कात आहे.



कोरोनाची धास्ती 


आयसीएमआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी देशभरात जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. देशात. सद्यस्थितीला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोना फोफावताना दिसत आहे. हे एकंदर चित्र पाहता रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा आरोग्य यंत्रणांपुढं मोठी आव्हानं उभी करत असून नागरिकांनाही धास्ती देऊन जात आहे.