मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा जामीन अर्ज 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने मंजूर केला आहे. मुंबई ड्रग्ज प्रकरणी आर्यन जवळपास तीन आठवड्यांपासून तुरुंगात होता. आता तो घरी परतणार आहे. यासाठी शाहरुख खान आता स्पेशल कोर्टात पोहोचला आहे. मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी शाहरुख इतर कायदेशीर प्रकिया पुर्ण करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खान कैद असलेल्या आर्थर रोड जेलबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आली आहे. जेलबाहेर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी दिसून येत आहे. थोड्याच वेळात आर्यन खान जेलबाहेर येणार आहे.


यावेळी आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरुखसोबत एका बॉलिवूड अभिनेत्रीने कोर्टात धाव घेतली. या पडत्या काळात अभिनेत्री किंग खानसोबत कोर्टात दिसली. बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला या प्रकरणात हमीदार होण्याची शक्यता आहे.  शाहरूख खानची मैत्रीण  जुही चावला special court पोहोचल्याची दृश्य झी २४ तासच्या कॅमेरात कैद झाली.



आर्यनच्या जामीनाची बातमी समोर येताच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली. आर्यनचा जामीन मंजूर होताच सेलिब्रिटींनी ट्विट करत आनंद व्यक्त देखील केला. दरम्यान मन्नतवर देखील मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं.