मुंबई : बॉलिवूडमधील १५ वर्षांच्या करिअरनंतरही अभिनेता जॉन अब्राहम अगदी सामान्य आयुष्य जगत आहे. बॉलिवूडमधील स्टेटसला मॅच करण्यासाठी येथे प्रत्येक कलाकार एका यशानंतर नवी महागडी कार किंवा महागड्या वस्तू खरेदी करतो. पण याला अपवाद आहे जॉन अब्राहम. बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे घालवल्यानंतरही त्याने त्याचे वैयक्तिक आयुष्य या झगमगाटापासून दूर ठेवले आहे. तो अगदी सामान्य जीवन जगतो. 
सध्या जॉन आपला आगामी सिनेमा परमाणु च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.


खुद्द जॉनने केला खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉडलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात केलेला अभिनेता जॉन अब्राहमने सांगितले की. मी एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे आणि झगमगाटापासून दूर रहात एक सामान्य जीवन जगतो. मी आत्मकेद्रींत नाही आहे. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मी काहीही करत नाही. माझ्याकडे बॉडीगार्ड नाही. मी घड्याळ घालत नाही. माझ्याकडे एक साधी कार आहे. मी मध्यमवर्गीय असल्यामुळे मी अधिक खर्चही करत नाही. मी माझ्या तत्त्वांनुसार माझे जीवन जगतो आणि त्यामुळे माझे जीवन मी झगमगाटापासून दूर ठेवले आहे.



यावर आधारीत आहे परमाणु सिनेमा


जॉनचा नवा सिनेमा ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोकरण ’लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीच्या कार्यकाळातील आहे. १९९८ मध्ये पोकरणमध्ये भारताच्या परमाणू परिक्षणावर आधारित आहे. ११ मे १९९८ ला राजस्थानच्या पोखरणमध्ये परमाणू परिक्षण करुन भारताने संपूर्ण जगाला चकीत केले. याबद्दल इतकी गुप्तता बाळगण्यात आली होती की जगाला याचा सुगावाही लागला नाही.