मुंबई  : भा.रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' ८० च्या दशकात साहित्यविश्वात धुमाकूळ घालत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ व्या दशकात चित्रपट रूपात पुन्हा भेटायला आलेला 'फास्टर फेणे'देखील तितकाच सुपरहीट ठरला आहे. 


 २७ ऑक्टोबरला सर्वत्र 'फास्टर फेणे' चाहत्यांच्या भेटीला आला. पहिल्या आठवड्यात दमदार कमाई करणारा हा चित्रपट दुसर्‍या आठवड्यातही तुफान सुरू आहे. 'सुपरहीट' ठरलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचे सेलिब्रेशनही तितकेच खास झाले. 


 'फास्टर फेणे'ची टीम शुक्रवारी शिवाजी मंदिरमध्ये पोहचली. यावेळेस सार्‍या टीमने 'गेला उडत' या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला. सिद्धार्थ जाधव हा 'गेला उडत' नाटकामध्ये प्रमुख भूमिका करत आहे. तसेच त्याने फास्टर फेणे चित्रपटामध्येही 'अंबादास' या अवलिया रिक्षा चालकाची भूमिका साकारली आहे. 


 फास्टर फेणे चित्रपटातील कलाकार अमेय वाघ, दिलीप प्रभावळकर सोबत क्षितिज पटवर्धन, आदित्य सरपोतदार आणि रितेश देखमुख आदी मंडळी उपस्थित होते. त्यांनी नाटकाचा आनंद घेत सेलिब्रेशन करतानाचे काही फोटो भद्रकाली प्रोडक्शनने त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत.