मुंबई : सेलिब्रिटी कपलच्या रिलेशनशिपच्या जेवढ्या चर्चा होतात. तेवढ्याच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यांच्या चाहत्यांच्या हृद्यात जागा करुन गेले. आणि अचानक त्यांचं ब्रेकअप झालं. सेलिब्रिटींच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना धक्का बसलाय. अशाच एका सेलिब्रिटी कपल आपण आज बोलणार आहोत. जे आधी रिलेशशिपमध्ये होते. कालांतराने या दोघांनी ब्रेकअप करत त्यांच्या चाहत्याांना धक्का दिला. दिशा आणि टायगर ही चाहत्यांची आवडती जोडी होती. मात्र आता अभिनेत्याच्या ब्रेकअपनंतर त्याच्या आयुष्यात आता नवीन दिशा आल्याचं म्हटलं जातय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटाणी आणि टायगरचं ब्रेकअपनंतर आता दोघंही एकमेकांना नेहमीच आपले चांगले मित्र म्हणतात. त्यांचं ब्रेकअप झालं असून टायगर आता दिशा धानुकाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याचं हे नातं सुमारे दीड वर्षांपासून सुरू झालं आहे. दिशा प्रोडक्शन हाऊसमध्ये मोठ्या पदावर काम करते.


याबाबत टायगरशी बोललं असता तो म्हणाला की, मला वाटते की माझे नाव दोन महिन्यांपूर्वी दुसऱ्या कोणाशी तरी जोडलं गेलं होतं. पण नाही, मी दोन वर्षांपासून अविवाहित आहे. दिशासोबत झालेल्या संभाषणाचाही अहवालात उल्लेख आहे. याबाबत दिशाने काहीही बोलण्यापासून मौन बाळगलं आहे. गेल्या वर्षी करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये टायगरने तो सिंगल असल्याचं सांगितलं होतं.


गेल्या अनेक दिवसांपासून दिशा आणि टायगर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होती. परंतु दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. याचबरोबर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. आता टायगरची गर्लफ्रेंड धानुका असल्याचं म्हटलं जातंय पण ही केवळ अफवा आहे की, खरंच टायगर तिच्यासोबत रिलेशन शिपमध्ये आहे. हे येणारा काळचं सांगू शकतो. दिशा पटाणी टायगरने 'बागी 2'मध्ये एकत्र काम केलं होतं.