मुंबई : 'बिग बॉस 15' हा शो शेवटच्या टप्प्यावर पोहोचत असताना घरातील समीकरणे दिवसेंदिवस बिघडत चालली आहेत. एकमेकांसोबत बोलणं टाळणारे घरातील सदस्य एकत्र दिसले, जे नेहमी एकत्र दिसले, ते एकमेकांपासून दूर जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोचं विजेतेपद मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये बरीच मारामारीही होत आहे. गेल्या एपिसोडमध्ये शमिता शेट्टी आणि राखी सावंत यांच्यात भांडण झाल्यानंतर राखीने तिच्या ब्रेस्ट सर्जरीबाबत मोठा खुलासा केला होता.


राखी सावंत आणि शमिता शेट्टी यांच्यात वाद


राखी सावंत 'बिग बॉस 15' मध्ये शो दरम्यान दिलेला टास्क करते. यादरम्यान शमिता शेट्टी आणि राखी यांच्यात हाणामारी झाली.राखी शमिताला एकमेकांपासून दूर जाण्यास सांगते.


त्यानंतर शमिता राखीला स्वतःपासून दूर ढकलते. राखी कुटुंबातील सर्व सदस्यांना सांगते की, शमिताने तिला ब्रेस्टवर धक्का दिला आहे. यानंतर कॅमेऱ्याकडे बघत ती म्हणाली, 'बिग बॉस तुम्ही कॅमेरा बघत आहात ना?'



शमिता जर मुलगा असती तर राखीने मारलं असते. राखी सावंत म्हणाली की, बिग बॉस मला तुमच्यावर खूप विश्वास आहे. इंग्रजीत शिव्या देऊन ती खूप हुशार बनते. तुम्हाला माहित आहे की, माझी सर्जरी झाली आहे, तिने मला जोरदार धक्का दिला. एक मुलगी आहे, मुलगा असती तर मी तिला मारले असते. बिग बॉस मी तुमचा खूप आदर करते.



राखीला दुखापत


यानंतर राखी सावंत स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जीकडे जाते आणि रडू लागते. ती म्हणते, 'शमिताने मला धक्का दिला आहे, पण तेव्हा माझ्यासाठी कोणीही लढले नाही.


देवोलिना भट्टाचार्जीने विचारले की वेदना होत आहे का, तर राखी सांगते की वेदना होत नाही पण त्याने नुकसान होते. यापूर्वी माझा काश्मीरमध्ये अपघात ही झाला होता. आत असलेला कोलेजेनचा गोळा फुटतो. त्यामुळे संपूर्ण शरीरात विष पसरते.