मुंबई : ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवाल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पहिलं कारण म्हणजे तिच्यावर घडलेल्या घटनेवर दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच या सिनेमावरून लक्ष्मी नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. अस असताना आता लक्ष्मीचा एक व्हिडिओ सोशल मीडियार व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत लक्ष्मी अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर पती, पत्नी और वो या सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. लक्ष्मीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर सर्वाधिक पसंत केलं जात आहे. 



लक्ष्मीसोबतचा हा व्हिडिओ कार्तिक आर्यनने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओत कॅप्शन लिहिलं आहे की,'मला हे आवडलं... मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.' तसेच या कॅप्शनमध्ये त्याने दिलचे इमोजीचा वापर केला आहे. 



आता अशी चर्चा आहे की, लक्ष्मी 'छपाक'च्या मेकर्सवर नाराज आहे. लक्ष्मी या सिनेमाकरता मिळालेल्या मानधनावर नाराज असल्याचं म्हटलं जातं आहे. लक्ष्मीला सिनेमाच्या कॉपीराइटकरता 13 लाख रुपये मिळाले आहे. ज्यावेळी ही रक्कम दिली गेली त्यावेळी लक्ष्मी खूष होती पण आता तिने यावर नाराजी व्यक्त केली आहे. 


लक्ष्मीला ज्यावेळी या चित्रपचटासाठीच्या मानधनाची रक्कम देण्यात आली, तेव्हा ती आनंदात होती. पण, आता मात्र ती जास्त पैसे मागत असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या या मागणीमुळेच chhapaakची टीम आणि तिच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं कळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच डोकं वर काढलेल्या या वादाविषयी चित्रपटाशी संलग्न कोणत्याच व्यक्तीकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, कलावर्तुळात त्याविषयीच्या चर्चांनी मात्र जोर धरला आहे. तेव्हा आता या प्रकरणाला मिळणाऱ्या वळणाकडे साऱ्यांचं लक्ष असेल असं म्हणायला हकत नाही.