Pyaar Ka Punchnama fame Actress : 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली सहगलनं नुकताच लेकीला जन्म दिला आहे. लेकीच्या जन्मानंतर सोनालीनं तिच्या नावाचा खुलासा केला आहे. सोनालीनं तिच्या लेकीचं नावं असं काही ठेवलं आहे ज्यामुळे आता तिच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. चला तर जाणून घेऊया की असं काय नाव दिलं आहे आणि त्याचा काय अर्थ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली सहगलच्या लेकीविषयी बोलायचं झालं तर तिचा जन्म 28 नोव्हेंबर रोजी झाला. सोनालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे. सोनालीनं इन्स्टाग्रामवर तिच्या लेकीचं नावं आणि त्याचा अर्थ काय हे सांगत पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये सोनालीनं तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही तर तिच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. सोनाली आणि तिच्या नवऱ्यानं त्यांच्या लेकीचे पाय धरत हार्ट शेप तयार केला आहे. 



हा फोटो शेअर करत सोनालीनं कॅप्शन दिलं की शुकर ए सजनानी. आज मी तुम्हाला माझी लाडकी लेक शुकरशी भेटवणार आहे. शुकर हे एक असं नाव आहे, जी आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आली आहे. तर आमचं आयुष्य हे जादूई करून टाकलं आहे. जी आमच्यासाठी प्रेम आणि आशीर्वादाप्रमाणे आहे. देवाला प्रार्थना आहे की ती कायम तिच्या नावाप्रमाणे चमकती राहो. शुकर तुझं या जगात स्वागत आहे. 


शुकर विषयी बोलायचं झालं तर हिंदीत असा कोणताही शब्द नाही. पण पंजाबमध्ये या नावाचा अर्थ आभारी असणं आहे. तर सोनालीनं जे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिच्या नवऱ्याच्या हातावर शुक्र लिहिलेलं आहे. हा एक हिंदी शब्द आहे. शुक्र शब्दाचा अर्थ घेतला तर ग्रह देखील म्हणू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, हा ग्रह तुमचा आणि पैशांचा संबंध हा कायम चांगला ठेवतो. शुक्र ग्रह हा नवग्रहांमध्ये मोजला जातो. तर हा आठवड्यातील सात वारांपैकी एक शुक्रवारचा स्वामी आहे. त्याशिवाय प्राचीन काळात दैत्यगुरू शुक्राचार्य यांचं नाव शुक्र होतं. 


हेही वाचा : 'हा यहाँ कदम कदम पर...', दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखला सर्व श्रेय मिळाल्याने गायक अभिजीतचा संताप


दरम्यान, सोनाली सहगल आणि आशिष हे गेल्यावर्षी जून महिन्यात लग्न बंधनात अडकले होते. या महिन्यात ऑगस्टमध्ये त्यांनी प्रेग्नंसीची घोषणा केली. करियर विषयी बोलायचं झालं तर 2011 मध्ये  'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याशिवाय 'सोनू के टीटू की स्वीटी', 'हाय जॅक', 'जय मम्मी दी' ते'JNU' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.