मुंबई : घटस्फोटानंतर सामंथा रुथ प्रभूचे दिवाळीचं सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. साऊथची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वीच सिनेस्टार नागा चैतन्यपासून घटस्फोटाची घोषणा केली होती. यानंतर, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सतत दिसून येत आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दिवाळीचा सणही खास पद्धतीने साजरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथा रुथ प्रभू राम चरणच्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती. वास्तविक, दिवाळी पार्टीत सहभागी होण्यासाठी सामंथा रुथ प्रभू साऊथ सुपरस्टार राम चरणच्या घरी एन्जॉय करताना दिसून आली.



राम चरणाच्या पत्नीकडून रिवील


फिल्मस्टार राम चरणची पत्नी उपासना हिने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.



जिथे अभिनेत्री सामंथा फिल्मस्टार राम चरणच्या पत्नीसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री अगदी आनंदात दिसून येत आहे. ती भूतकाळ मागे टाकत पुढे जाताना दिसत असल्याचं बोललं जात आहे. 



दरम्यान सामंथा आणि नागा चैतन्यची ही एकमेकांशिवाय पार पडलेली पहिली दिवाळी ठरणार आहे.