'रक्ताने माखलेली मांजर...', दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी घरात दिसलं भयानक दृश्य, मैत्रिणीने इतक्या वर्षांनी केला खुलासा

गुड्डी मारुतीने सांगितलं की, दिव्या भारती प्रत्येक क्षण आपला शेवटचा आहे अशाप्रकारे जगत असे. दिव्याच्या मृत्यूनंतर झालेल्या एका घटनेचाही खुलासा तिने केला आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला होता.   

Shivraj Yadav | Nov 07, 2024, 07:55 PM IST
twitter

गुड्डी मारुतीने सांगितलं की, दिव्या भारती प्रत्येक क्षण आपला शेवटचा आहे अशाप्रकारे जगत असे. दिव्याच्या मृत्यूनंतर झालेल्या एका घटनेचाही खुलासा तिने केला आहे, ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला होता. 

 

1/11

दिव्या भारती आज या जगात नसली तरी काही ना काही कारणास्तव चाहते तिची आठवण काढत असतात. फक्त वयाच्या 19 व्या वर्षी दिव्याने आपला जीव गमावला होता. तिच्या निधनासंबंधी अनेक किस्से आजही सांगितले जातात. त्यातच आता गुड्डी मारुतीने अनेक किस्से सांगितले आहेत.   

twitter
2/11

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. फार कमी वयात तिने यशाच्या पायऱ्या चढल्या होत्या. तिच्या अनेक मोठे चित्रपट होते. पण यादरम्यान 1993 मध्ये अचानक तिने आपला जीव गमावला आणि सगळं काही उद्ध्वस्त झालं.   

twitter
3/11

फक्त 19 व्या वर्षी दिव्या भारतीचं निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक दावे, खुलासे करण्यात आले होते. त्यातच आता अभिनेत्री गुड्डी मारुतीने यावर भाष्य केलं आहे.   

twitter
4/11

अलीकडेच, सिद्धार्थ काननसह साधलेल्या संवादात गुड्डी मारुतीने दिव्या भारतीची आठवण काढली. तिने दिव्या फार गोड, सुस्वभावी, दयाळू मुलगी होती असं सांगितलं. दिव्या ही फिल्म इंडस्ट्रीची नव्याने उदयास येणारी स्टार होती असंही तिने सांगितलं.   

twitter
5/11

या वेळी गुड्डीला ती घटना आठवली जेव्हा तिने एका रात्री दिव्याला पाचव्या मजल्यावर तिच्या अपार्टमेंटच्या भिंतीवर बसलेले पाहिले. ती उंचीची कोणतीही भिती नसल्याप्रमाणे बसली होती असं तिने सांगितलं. याशिवाय त्याने एक भीतीदायक घटनाही उघड केली.  

twitter
6/11

गुड्डीने दिव्याशी संबंधित एका घटनेबद्दल सांगितलं की, "दिव्या जुहू येथील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहत होती. एका रात्री मी तिच्या बिल्डिंगजवळच्या एका आईस्क्रीमच्या दुकानात जात असताना मला कुठूनतरी माझं नाव ऐकू आलं. मी वर पाहिलं तर दिव्या पाचव्या मजल्यावरच्या टेरेसवर पाय बाहेर लटकत बसली होती. मी म्हणाले हे खूप धोकादायक आहे, आत जा. पण ती मला म्हणाली, 'काही होणार नाही.' तिला उंचीची भीती वाटत नव्हती, तर मी तिच्याकडे पाहून घाबरले होते".  

twitter
7/11

दिव्या आपल्याला थोडा त्रास देत असे. ती आपलं आयुष्य जगायची जणू काही आज शेवटचा दिवस आहे. ती फार बिनधास्त राहत असे असंही तिने सागितलं.   

twitter
8/11

तिने पुढे सांगितलं की, "दिव्या आणि साजिद नाडियाडवाला त्यावेळी सोबत होते. आम्ही 'शोला और शबनम' चित्रपटासाठी शुटिंग करत होता".  

twitter
9/11

यानंतर दिव्याच्या मृत्यूची घटना आठवत तिने सांगितलं की, "दिव्याचा मृत्यू 5 एप्रिलला झाला आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 एप्रिलला माझा वाढदिवस असतो. म्हणूनच आम्ही सर्वांनी एकत्र पार्टी केली. पार्टीत ती मला थोडी उदास दिसत होती."  

twitter
10/11

गुड्डीने सांगितले की, दिव्याला काही प्रोजेक्टच्या निमित्ताने आऊटडोअर शूटसाठी जायचं होतं, पण तिची जाण्याची इच्छा नव्हती. यानंतर, 6 एप्रिल रोजी सकाळी सर्वांना दिव्याच्या निधनाची बातमी मिळाली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. या अपघाताने तिचा पती साजिद नाडियादवाला मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, त्याचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत होते.  

twitter
11/11

यासोबतच गुड्डीने दिव्याच्या मृत्यूनंतर घडलेल्या आणखी एका भयानक घटनेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, दिव्याच्या मृत्यूनंतर पाहुण्यांनी तिच्या आईला भेटून शोक व्यक्त केला. तेवढ्यात अचानक कुठूनतरी एक मांजर त्यांच्या घरात शिरली आणि तोंडाला रक्त लागलेलं होतं. तिला पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता.  

twitter