मुंबई : 'नागीण' या मालिकेतून घराघरात पोहचलेली मौनी रॉय 'गोल्ड' चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलेल्या मौनीला आता बॉलिवूडचा दुसरा चित्रपट मिळाला आहे. 


 'ब्रह्मास्त्र' या अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्टसोबत मौनी रॉय झळकणार आहे. हा चित्रपटपट तीन भागांमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मौनी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.  
 
 रहस्य,रोमांस, जादू अशा अनोख्या प्रकारातील हा चित्रपट आहे. यामध्ये प्रत्येक भूमिकेकडे कोणतीतरी जादू असते. 
 
 गोल्ड चित्रपटामध्येही १४ व्या ऑलंपिक खेळामध्ये पहिलं मेडल जिंकण्याचा प्रवास यामध्ये दाखवला जात आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.