मुंबई : सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रीचा सुपरहिट चित्रपट 'द कश्मीर फाईल्स'ची चर्चा आहे. अनुपम खेर यांचा हा चित्रपट प्रमोशनशिवाय थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. सिनेमाचा प्रत्येक शो हाऊसफुल दिसत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि कहाणी कोणती जशीच्या-तशी प्रेक्षकांसमोर मांडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी कधीच कोणाला घडलेल्या गोष्टी ना सांगितल्या ना कोणाला चुकीच्या दाखवल्या. हा सिनेमा पाहिल्यावर थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसतात. या चित्रपटाची चर्चा दिवसेंदिवस वाढतच आहे. 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 3 दिवसांत 25 कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.


अशा परिस्थितीत, चाहते OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप झालेली नसली तरी, जर तुम्ही अंदाज लावलात तर साधारण महिनाभरात म्हणजेच लवकरच तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहायला मिळेल.


विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय दीपक मांडेलकर असे अनेक मोठे कलाकार दिसले आहेत. या चित्रपटावर बराच काळ कोणताही मोठा स्टार बोलला नव्हता. त्यामुळे चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता चित्रपटातील कलाकारही या चित्रपटाविषयी बोलू लागले आहेत. हा चित्रपट 11 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने थेट 25 कोटींची कमाई केली आहे.