मुंबई : बॉलिवूड स्टार किड्समध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहरूखची मुलगी सुहानाची चर्चा नेहमीच होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे कबीर बेदी यांची नात आणि पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवाला. आलिया तशी मीडियापासून दोन हात दूर राहते आणि बॉलिवूड पार्ट्यांमध्येही कमी दिसते. पण तरीही तिचं नाव टॉपच्या ग्लॅमरस स्टार किड्समध्ये घेतलं जातं. 



आलिया सोशल मीडियात चांगलीच अ‍ॅक्टिव्ह राहते आणि आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.


 


पूजा बेदीने १९९४ मध्ये फरहान फर्नीचरवालासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगी आलिया १९९७ मध्ये झाली. त्यानंतर पूजाने २००३ मध्ये घटस्फोट घेतला. 




आलिया सध्या शिक्षण घेत आहे. ती ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्यूएट करत आहे. आलियाला हॉकी, फुटबॉल आणि स्मिंग करण्याची आवड आहे.