kareena kapoor ला कोरोना; मुंबईतील राहतं घर सील
दुसरीकडे बॉलिवूडकरांना मात्र मोकळं
मुंबई : आताची घडीची सर्वात मोठी बातमी.. अभिनेत्री करिना कपूरचं घर सील करण्यात आलं आहे. करिना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर. त्यामुळे तिचं घर सील करण्यात आलं आहे.करीना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण झालीय.. बॉलिवूडच्या पार्ट्यांमुळे कोरोना वाढतोय की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. बॉलिवूडच्या पार्ट्या सुपरस्प्रेडर ठरू लागल्या आहेत.
एकीकडे सामान्यांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जातेय. तर दुसरीकडे बॉलिवूडकरांना मात्र मोकळं रान दिलंय की काय असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.
बीएमसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता आहे. दोघंही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात. तसंच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे.
बीएमसीने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे रिपोर्ट आज येऊ शकतात.
दोन्ही अभिनेत्री पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेशही बीएमसीकडून देण्यात आले आहेत. यासोबतच त्या भेटलेल्या लोकांचे डिटेल्स आणि त्यांचं ट्रेसिंग केलं जात आहे.