मुंबई : अभिनेता सलमान खान चर्चेत येण्यास अगदी लहानसं कारणंही पुरेसं आहे. त्यातच बॉलिवूडचा हा दबंग अभिनेता कोणा रुपवान तरुणीसोबत दिसला, की चर्चा तर होणारच.... त्यात सध्या एका अशाच कारणवरुन चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही  दिवसांपूर्वी सलमान त्याची बहिणी म्हणजेच अर्पिता खान हिचा पती, आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पोहोचला होता. पार्टीसाठी सलमान ज्या कारनं आला, त्याच कारमधून एक खास व्यक्तीही उतरली.  ही खास व्यक्ती म्हणजे सलमानची कथित प्रेयसी, युलिया वंतूर ( Iulia Vantur)


सलमानमागोमागच ती कारमधून उतरली. माध्यमांकडे न पाहताच थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी गेली. ती गेल्याचं पाहण्यासाठी म्हणून सलमानचीही नजर वळली, आणि बस्स मग काय चर्चा सुरु झाली बी- टाऊनच्या या स्टार आणि बहुचर्चित जोडीची. 


आकता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसली ते ही एका पार्टीलाचं. नुकतच सेलिब्रिटींकडून दिवाळी पार्टीचं आयोजन केलं जात आहे. त्यातच सोहाली खानने खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला सलमानसोबत युलिया वंतूरने हजेरी लावली. पण मागील पार्टी प्रमाणेच यावेऴीही दोघांनी एकत्र फोटो काढले नाहीत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान कारमधून उतरला आणि मीडियाला फोटो देण्यासाठी पुढे आला. पण कारमधून उतरताच युलिया काही जवळच्या मंडळींची भेट घेत आत निघून गेली. ती आत गेली का हे पाहण्यासाठी सलमान देखील मागे वळला. 


सलग दुसऱ्यांदा ही जोडी एकत्र दिसल्याने या जोडीची तुफान चर्चा रंगते आहे, सोबतच कतरिनाच्या लग्नाच्या चर्चेनंतर या दोघांची वाढलेली जवळीक याबाबत ही चर्चा होता आहे.