मुंबई : कॉन्सर्टसाठी गेलेल्या प्रसिद्ध गायक केके (kk) उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ यांच (krishna kumar kunnath passes away) 1 जून रोजी निधन झालं. केकेनंतर आता लोकप्रिय ओडिया गायक मुरली महापात्रा (Murali Mohapatra) यांचं ओडिशातील कोरापूट येथे दुर्गा पूजा सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करताना स्टेजवरच निधन झाले. गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी त्यांनी श्रद्धांजली देत आहेत. (odia singer murali mohapatra collapses on stage)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, महापात्रा यांची तब्येत ठीक नव्हती आणि जयपूर शहरात (ओडिशा) चार गाणी गायल्यानंतर ते अचानक स्टेजवरील खुर्चीवर बसले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचं निधन झालं होतं. (singer murali mohapatra passes away)



महापात्रा यांचे भाऊ बिभूती प्रसाद महापात्रा यांनी सांगितलं की, ओडिया गायकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महापात्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पटनायक यांनी ट्विट केले की, 'लोकप्रिय गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांचा मधुर आवाज श्रोत्यांच्या हृदयात नेहमीच आनंदाची भावना निर्माण करेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ' ((singer murali mohapatra family)


मुरली महापात्रा यांच्या निधनाने कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या संगीत कॉन्सर्टमध्ये केके (कृष्णकुमार कुन्नाथ) यांच्या मृत्यूची आठवण करून दिली. केके यांच्या निधनामुळे देखील कलाविश्वाला मोठा धक्का बसला.