मुंबई :  बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लग्नबंधनात अडकल्यापासून सतत चर्चेत आहेत. त्यांची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्षेवधून घेणारी ठरत आहे. यावेळी विकी कौशलचा एक फोटो सगळ्यांनाच चकीत करणारा ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर विकी कौशलमध्ये मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. लग्नानंतर काही दिवसांनी विकी आणि कतरिना जयपूर येथून मुंबईला परतले. त्यानंतर दोघांनी नवीन घरात गृहप्रवेश केला आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. 


कतरिनाने नवीन घरात पाऊल ठेवताच आपल्या प्रिय पतीसाठी हलवा तयार केला होता. ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. विकीने पत्नीने तयार केलेल्या डिशचं कौतुक केलं होतं.



त्यानंतर काही दिवसांनी लगेचच विकी कामावर परतला. नुकतीच कतरिना विकीला एअरपोर्टवर ड्रॉप करण्यासाठी पोहोचली होती. त्यानंतर आता विकीचा डोल-शोले लूकमधील फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो आपली फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. विकीने त्याचे हे नवीन फोटो त्याच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर दाखवले आहे, ज्यामध्ये तो खूपच फिट दिसत आहे.


विकीने आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. विकीची ही तयारी त्याच्या नवीन सिनेमासाठी सुरु असल्याचं ही बोललं जात आहे. 



स्वत:चा हा फोटो शेअर करताना, विक्की कौशलने कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही, मात्र डोले-शोले इमोजी नक्कीच शेअर केले आहेत. विकीच्या या फोटोवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.