मुंबई : बॉलिवूड गायक मिका सिंग त्याच्या पाकिस्तानातील एका परफॉर्मेंसमुळे अडचणीत आला आहे. भारत-पाकिस्तान तणावग्रस्त परिस्थितीत मिका सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील त्याच्या परफॉर्मेंसचा होता. आता हा व्हिडिओ सर्वांसमोर आल्यानंतर मिका सिंगला मोठा विरोध होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून (AICWA) मिका सिंगवर बंदी घालण्यात आली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी अधिकृत पत्रक जाहीर करत याबाबत माहिती दिली.



असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी, मिकाच्या चित्रपटाचं प्रॉडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाइन कंटेंट प्रोव्हायडर यांच्याबरोबर त्याचे सर्व करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. 



या व्यतिरिक्त असोसिएशनने मिकाचे सर्व चित्रपट, गाणी आणि एंटरटेन्मेंट कंपनीसोबत काम करण्यासही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.



इंडस्ट्रीमध्ये मिकासोबत कोणीही काम करणार नाही याकडे, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन लक्ष ठेवणार आहे. जर एखाद्या कलाकाराने असं केलं तर त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. देशापेक्षा मिकाला पैसा अधिक महत्त्वाचा वाटला असल्याचंही, सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी म्हटलंय.


काय आहे प्रकरण 



गेल्या काही दिवसांपूर्वी कराचीमधून मिका सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभात मिका परफॉर्म करत असल्याचं दिसतंय. अनेकांनी मिकाच्या या परफॉर्मेंसवर नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांकडूनही मिकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.