Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. समांथानं तिच्या अभिनयानं आणि सुंदरतेनं सगळ्यांची मने जिंकली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रीपैकी एस असण्यामुळे नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या खासगी आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत असते. समांथानं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सध्या समांथा ही तिच्या कुटुंबामुळे चर्चेत आहे. ज्याचं कारण तिचा भाऊ डेव्हिडचं लग्न आहे. समांथानं सोशल मीडियावर या लग्नाच्या समारंभातील फोटो शेअर केले आहेत. समांथानं तिच्या भावाच्या लग्नासाठी अमेरिकेतील विस्कॉन्सिनच्या इथे असलेल्या लेक जेनेवा शहरात पोहोचली होती. त्यावर नुकत्याच समोर आलेल्या फोटोंवरून समांथानं वाईन रंगाचा स्टायलिश गाउन परिधान केला आहे. तिच्या हातात फूलांचा गुच्छ दिसतोय. त्या फोटोंमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे. कुटुंबासोबत घालवलेल्या या सगळ्या आनंदी क्षणांना समांथानं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. समांथानं सोशल मीडियावर तिच्या भावाच्या लग्नातील ही फोटो शेअर केले आहेत. 



समांथाचे हे फोटो पाहून तिचे चाहती तिची स्तुती करत आहेत आणि इतकंच नाही तर लाइक आणि कमेंट देखील करत आहेत. त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. समांथाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच सिटाडेल - हनी बनी या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. 7 नोव्हेंबर 2024 रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की या वेब सीरिजमध्ये समांथा ही पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 



हेही वाचा : ...तर राज कपूर यांनी नात करिश्मा कपूरचं जन्मानंतर तोंडही पाहिलं नसतं! 50 वर्षांपूर्वी ठेवली होती 'ही' एक अट


समांथाविषयी बोलायचं झालं तर तिनं 14 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की अभिनयाशिवाय समांथा ही अभ्यासात देखील खूप हुशार होती. ती तिच्या शाळेच्या काळात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होती.