After Nagarjuna Chiranjeevi's Video From Airport Viral : दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आणि धनुषनंतर आता अभिनेता चिरंजीवी यांचा विमानतळावरील व्हिडीओची चर्चा. चिरंजीवी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तर या सगळ्यात त्यांचे चाहते त्यांना पाठिंबा देत आहेत. मात्र, सोशल मीडियावर मिळणारी रिअॅक्शन ही विरूद्ध अर्थात निगेटिव्ह आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा हे विमानतळावरील लिफ्टमधून बाहेर पडताना दिसले. जेव्हा इंडिगो एअरलाइन्सच्या एका कर्माचाऱ्यानं चिरंजीवी यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो चुकून चिरंजीवी यांच्या रस्त्यात होता. त्यावेळी चिरंजीवी यांनी त्या कर्मचाऱ्याला जोरात धक्का दिला आणि पुढे निघून गेले. या घटनेवर लोकांनी ऑनलाइन प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी चिरंजीवी यांचं ही वागणुक पाहून त्यांना खूप ट्रोल केलं आहे. 



एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'घमंडी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हाच का तुमचा खरा चेहरा!' एकीकडे अनेक लोक त्यांच्यावर नाराज आहेत. तर दुसरीकडे चिरंजीवी यांच्या चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'लोकांना हे असभ्य वाटतंय, पण लोकांना एवढं कळत नाही का की त्यांना वेळ द्यावा. कमीत कमी त्यांच्यासोबत फोटो काढण्याआधी त्यांना विचारा तरी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्यांनी यासाठी विचारायला हवं होतं. लोकप्रिय सेलिब्रिटींवर दबाव टाकू नका. ते देखील माणूस आहेत. आपण मनोरंजनासाठी चित्रपट पाहतो. आपण पैसे दान करत नाही. चिरू यांनी त्यांच्या चॅरिटीनं हजारो लोकांचा जीव वाचवला आहे. ते नेहमीच प्रेरणा ठरले आहेत.'



हेही वाचा : 'आम्ही पुरुष मूर्ख असतो!' घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनंतर अर्जुन रामपालनं व्यक्त केली खदखद


संपूर्ण कोनिडेला कुटुंब हे पॅरिसच्या ओलम्पिक उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालं होतं. त्यांनी ओलम्पिकच्या चिन्हासोबत हातात झेंडा घेत फोटो देखील काढला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डवर पत्नीसोबत फोटो देखील शेअर केले. त्यासोबत त्यांनी कॅप्शन दिलं की '#PARIS2024 ओलम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी खूप उत्साही आहे. सुरेखासोबत ओलम्पिक मशाली प्रतिमा पकडनं खूप आनंदी क्षण होता. आमचा गौरव असलेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला शुभेच्छा आणइ आतापर्यंतची सगळ्यात चांगली पदकांची नवी यादी तयार करा! जय हिन्द।'