मुंबई : सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु आर्ची म्हणून घराघरात पोहोचली. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये खूप वाढ झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवत या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला.


आता नागराज नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बिग बींची मुख्य भूमिका असलेल्या 'झुंड' सिनेमाची सध्या एकच चर्चा आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरु या सिनेमात दिसणार आहे. 


या सिनेमात मोनिकाची भूमिका ती साकारणार आहे. मोनिकाचा लूक कसा असणार याची झलक तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवली आहे.



कपाळावर गोंदण, वेणी, विस्कटलेले केस असा अत्यंत साधा लूक यात तिचा दिसून येत आहे. 'नमस्ते मेरा नाम है मोनिका' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. सध्या आर्चीच्या या वेगळ्या लूकची एकच चर्चा होत आहे.