फ्रिजमध्ये ठेवा लिंबाचा एक तुकडा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

लिंबूचा वापर जेवणापासून ते साफसफाईपर्यंतच्या विविध कामांसाठी केला जातो. तेव्हा फ्रिजमध्ये लिंबूचा तुकडा ठेवल्याने कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.   

| Jan 06, 2025, 14:13 PM IST
1/7

सध्या प्रत्येक घरामध्ये अन्न दीर्घकाळ स्टोअर करून ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. अशावेळी फ्रिज स्वच्छ ठेवणं महत्वाचं ठरतं. फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी लिंबूचा एक तुकडा कामी येऊ शकतो. लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे फ्रिज बॅक्टेरीया आणि इन्फेक्शन पासून दूर राहतो. 

2/7

फ्रिजमध्ये लिंबाचा तुकडा ठेवल्याने फ्रिजची हवा नैसर्गिकपणे स्वच्छ राहण्यास मदत होते. फ्रिज कितीही स्वच्छ ठेवला तरी त्यातून बऱ्याचदा कुबट वास येतो. काहीवेळा हा वास फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्न पदार्थांना सुद्धा येऊ लागतो. असं झाल्यास तुम्ही एका लिंबाचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेऊ शकता. 

3/7

लिंबूमध्ये असलेलं सिट्रिक अ‍ॅसिड फ्रिजमधील दुर्गंधीला दूर ठेवतं आणि हवेला देखील नैसर्गिकपणे फ्रेश आणि सुगंधित ठेवते.   

4/7

काही असे पदार्थ असतात जे फ्रिजमध्ये ठेवल्यावरही लवकर खराब होतात. असे पदार्थ खूप दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. 

5/7

लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट्स आढळतात. जे पदार्थांना सडण्यापासून रोखतात आणि फ्रेश ठेवतात. परंतु फ्रिजमध्ये लिंबू ठेवताना तो स्वच्छ आणि ताजा आहे की नाही याकडे लक्ष द्या. 

6/7

फ्रिजमध्ये लिंबू कापून ठेवल्यामुळे अन्न लगेचच बॅक्टेरियाच्या संपर्कात येण्यापासून वाचवते. फक्त लिंबाचा एक तुकडा फ्रिजमध्ये ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही.  संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)