मुंबई : 'सोनू के टीटू की स्वीटी' हा सिनेमा सध्या चौथ्या आठवड्यामध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अजय देवगणचा 'रेड' चित्रपटही रीलीज झाला आहे. मात्र बॉक्सऑफिसवर त्याचा एकामेकांवर परिणाम झालेला दिसत नाही. 


100 कोटी क्लबमध्ये झेप 


 



सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटाने चौथ्या आठवड्यामध्ये 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. कोणताही मोठा कलाकार या चित्रपटामध्ये नाही. बॉलिवूडमध्ये नवख्या असणार्‍या कलाकारांनी हे यश मिळवले असल्याने त्याबद्दल सार्‍यांना कौतुक आहे. 


कलाकारांनी सेलिब्रेट केलं यश 



 


कार्तिक आर्यन आणि सनी सिं‍ह  या चित्रपतातील प्रमुख कलाकारांनी ढोल वाजवत, भांगडा करत 100 कोटी क्लबचं यश सेलिब्रेट केलं आहे. कार्तिकलाही चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं आहे. सोशलमीडियावरही आयर्नचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहेत.