मुंबई : ‘परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण’सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. जॉन अब्राहम सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जातोय. त्यावेळी तो सिनेमातील तसेच स्वत:आयुष्यातील अनेक किस्से शेअर करतोय. त्याच्याकडे सध्या खूप साऱ्या सिनेमाच्या ऑफर आल्या आहेत पण त्याला कॉमेडी सिनेमा करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्या आवडत्या शैलीत काम करायची इच्छा त्याने व्यक्त केली. आपल्या स्वत:च्या बॅनरखाली त्याला एक कॉमेडी सिनेमा करायचा आहे. मला कोणी चांगल्या कॉमेडी सिनेमाची पटकथा देत नाहीए, म्हणून मी स्वत: यावर काम करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याने सांगितले. ‘परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्याकडे सत्यमेव जयते, बॉटला हाऊस, रॉ असे सिनेमा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेच्या दिवसात आपली वर्ग शिक्षिका खूप आवडायची असेही त्याने यावेळी सांगितले.  'झी टीव्ही'च्या ‘डांस इंडिया डांस लिटिल मास्टर्स’या शो मध्ये तो बोलत होता. क्रश माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. ती खूप सुंदर आणि हुशार असल्याचे एक दिवस त्याने वडिलांना आवडणाऱ्या शिक्षिकेबद्दल सांगितले.  


परमाणु चाचणीवर आधारित 


हा सिनेमा भारत सरकारच्या अंडरग्राउंड परमाणु चाचणीवर आधारित आहे. या अणुचाचणींने भारताने सहाव्या अणुप्रकल्पची निर्मिती केली. प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, ‘परमाणु द स्‍टोरी ऑफ पोखरन’साठी ३ वर्षे संशोधन करण्यात आले. सिनेमाची कथा जॉनच्या कार्यालयातच तयार झाली आहे.