मुंबई :  राज कुंद्रा (Raj Kundra) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज कुंद्राचं पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यामुळे शेट्टी आणि कुंद्रा कुटुंबातील अडचणी वाढल्या आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्याता आली आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टीची देखील सतत चौकशी करण्यात येत आहे. आता राज कुंद्रा आणि शिल्पाच्या विवादाबद्दल नाही तर त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजने विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये शिल्पाला प्रपोज करण्यासाठी किती मेहनत घेतली त्याचा खुलासा केला. राज कुंद्रानुसार ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा शिल्पाने 'बिग ब्रदर' रियालिटी शोमध्ये बाजी मारली होती.  तेव्हा राजच्या मनात भीती होती ती  म्हणजे, शिल्पा आपल्याला 'ब्रो झोन'मध्ये तर नाही ठेवणार. 


'ब्रो झोन'म्हणजे भाऊ तर नाही ना करणार....  शिल्पाला प्रपोज करण्यासाठी फार मेहनत केली असं देखील राज म्हणाला होता. राज सर्वप्रथम शिल्पाच्या आईचं मन जिंकलं, त्यानंतर राजने शिल्पाच्या वडिलांच्या मनात घर केलं. एवढंच नाही तर राजने शमिता शेट्टीचं देखील मन जिंकलं. याशिवाय राजने शिल्पाच्या पेट्सवर देखील प्रेम केलं. 


राजने शिल्पावर एवढा दबाव टाकला त्यानंतर शिल्पाला होकार द्यावा लागला. त्यानंतर शिल्पा आणि राजचं 2009 साली लग्न झालं. शिल्पा आणि राजला दोन मुलं आहे.