Atlee Kumar’s Wife Priya Is Pregnant : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता राम चरणनं (Ram Charan) सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकप्रिय दिग्दर्शक एटली कुमार (Atlee Kumar)  यांन त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एटलीची पत्नी प्रेग्नंट असल्याची बातमी त्यानं चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एटलीनं ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटली कुमारची पत्नी प्रियानं (Atlee's Wife Priya) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत ते लवकरच आई-वडील होणार असल्याचे तिनं सांगितले. प्रियानं शेअर केलेल्या फोटोत ती एटली आणि त्यांचा श्वान दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रियानं कॅप्शन दिलं की, 'मी प्रेग्नंट असल्याचे सांगत मला आनंद होत आहे. आम्हाला तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची गरज आहे. प्रेमासह- ऍटली आणि प्रिया.' प्रियानं शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे.


पाहा पोस्ट 



हेही वाचा : ऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही...; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा



प्रिया आणि एटली बरेच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी नात्याला नाव देण्याचे ठरवले आणि 9 नोव्हेंबर 2014 रोजी चेन्नईत लग्न बंधनात अडकले. एटली आणि प्रिया यांनी एकत्र एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे, ज्या अंतर्गत त्यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत. 


प्रियाने तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. एटली हा तामिळ चित्रपट ‘राजा रानी’, ‘​​थेरी, ‘मेर्सल’, ‘बिजिल’ यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. जातात. दरम्यान, एटलीनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या ‘जवाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात नयनताराही मुख्य भूमिकेत आहे. तर, विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (After Ram charan Shahrukh khan s jawan director atlee kumar s wife is pregnant)