Ram Gopal Varma's Photo With Actress Apsara Rani : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या चर्चेच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसतंय. रंगीला, सत्या, कंपनी, सरकार यांसारखे दर्जेदार फिल्म (Film Director) बनवणारे राम गोपाल वर्मा यांनी ट्रॅक बदलला की काय?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. नव्वदीचं दशक गाजवणाऱ्या राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडीओ (Obscene Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका देखील होताना दिसत आहे. राम गोपाल वर्मा म्हणजेच सर्वांचे लाडके RGV आता 'गन आणि थाईज' (Guns and Thighs) सारखा अर्ध प्रौढ सिनेमा बनवत आहेत. एका मुलाखतीदरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी  (Ram Gopal Varma Licks Actress Ashu Reddy Feet) एका अभिनेत्रीच्या पायाचं चुंबन (Kiss) घेतलं. त्यांच्या या अश्लिल हरकतीमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेंजरस' फेम अभिनेत्री अप्सरा राणीच्या कंबरेवर हात ठेवून उभा असलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्माला आणखी ट्रोल केलं आहे. डेंजरस चित्रपटात अप्सरा रानी आणि नैना गांगुली मुख्य भूमिकेत आहे. दोघांचे चित्रपटातील सीन चर्चेचा विषय ठरले होते. इंटीमसी आणि ए़डल्ट कंटेन्टमुळे या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालं होतं. राम गोपाल वर्मानं अप्सरा राणीसोबत फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'मी आणि अप्सरा राणी, आम्ही प्रसाद मल्टीप्लेक्स स्क्रीन 5 वर 8.45 वाजता डेंजरस फिल्मचा मॉर्निंग शो पाहणार आहोत.' 



या फोटोमध्ये अप्सरा राणी लेपर्ड प्रिंटच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर राम गोपाल वर्मानं जीन्स टी-शर्ट परिधान केली आहे. 'डेंजरस' हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता पण त्याच्या वादग्रस्त कंटेन्टमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. राम गोपाल वर्मा यांच्या काही वादग्रस्त चित्रपटांपैकी हा एक आहे. नुकतंच राम गोपाल वर्मानं आशु रेड्डीसोबत 'खतरा डेंजरस'चं प्रमोशन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 


कोण आहे आशु रेड्डी ?


आशु रेड्डी (Ashu Reddy) एक तेलगू चित्रपट अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर (Social Media Influencer) आहे. आशु अमेरिकेतील डेलासमध्ये राहते. इन्स्टाग्रामवर तिचे 1.8 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तिने 2018 मध्ये चल मोहन रंगा या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.


हेही वाचा : Ram Gopal Varma ने ओलांडल्या सर्व मर्यादा; अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss


दरम्यान, 2019 मध्ये आशु 'बिग बॉस तेलगू सीझन 3' मध्ये सहभाग झाली होती. तिनं एकाच वेळी दोन मुलांना अनेकदा डेट केलंय, असा खुलासा तिनं केला होता. जर समोर दोन हँडसम पुरुष असतील तर दोघांना डेट करण्यात चुकीचं काय?, असा सवाल देखील तिनं विचारला होता. त्यामुळे ती चर्चेत देखील आली होती. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma New Movie) यांचा 'डेंजरस' चित्रपट हा येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे