Sanjay Dutt and Sunil Shetty : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनंतर अनेक सेलिब्रिटींना महादेव अॅप प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयानं चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समोर आले आहे. तर आता लायन बूक अॅप प्रकरणी देखील काही सेलिब्रिटींनी समन्स बजाावलं आहे. लायन बूक अॅप सौरभ चंद्राकर, रवि उप्पल आणि हितेश खुशलानी हे सांभाळत होते. तपासात ही गोष्ट समोर आली आहे की 20 सप्टेंबरला दुबईच्या फेयरमॉन्ट हॉटेलमध्ये हितेश खुशलानीच्या वाढदिवसानिमित्तानं बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, डेजी शाह, सोफी चौधरी आणि सुखविंदर सिंह सारख्या अनेक मोठ्या लोकांची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियी रिपोर्ट्सनुसार, या पार्टीचे आयोजन महादेव बूर अॅपच्या सक्सेससाठी करण्यात आले होते. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांची ही कंपनी दुबईमधून कार्यरत होती. हा अॅप सट्टेबाजीच्या मदतीनं पैसे कमावण्याचा आमिष दाखवून युजर्स मिळवतात. ऑनलाइन कसीनो, पोकर, कार्ड गेम, तीन पतती कार्डसारखे खेळ खेळण्यास भाग पाडतो. याशिवाय बॅड मिंटन, टेनिस, फूटबॉल, वर्चुअल क्रिकेट आणि लाइव्ह क्रिकेटवर देखील सट्टेबाजी करण्यात येते. तपासात एक गोष्ट समोर आली आहे आणि ते म्हणून लायन बूक अॅप देखील महादेव अॅपसारखंच काम करतं. एजंट्स आणि हवाला ऑपरेटर्सकडून पैसे मिळाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी या अॅपला प्रमोट केले होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कशी झाली महादेव बूक अॅपची सुरुवात?


छत्तीसगडचे भिलाई निवासी रामेश्वर चंद्राकर नगर निगममध्ये पाण्याचा पंप चालवणाऱ्या ऑपरेटरचं काम करत होते. सौरभ हा त्यांचाच मुलगा आहे. सौरभनं 28 व्या वर्षी भिलाई येथे ज्यूसचं दुकान टाकलं. त्यानंतर त्याची आणि रवि उप्पल या दोघांची चांगली मैत्री झाली. रवि उप्पल हा इंजिनियर आहे. 2017 मध्ये रवी आणि सौरभ यांनी मिळून ऑनलाइन सट्टेबाजीद्वारे पैसे कमवण्यासाठी वेबसाइट तयार केली. 2019 मध्ये सौरभ दुबईला गेला आणि तिथून त्यानं रवी उप्पलला फोन केला. यानंतर दोघांनी दुबईमध्ये महादेव बूक ऑनलाइन नावाने बेटिंग वेबसाइट आणि अॅप तयार केले. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून त्याचा प्रचार सुरू केला. करोना महामारीच्या काळापासून या अॅपने खूप वेग घेतला.


कसा आला हा घोटाळा समोर?


संपूर्ण घोटाळा यंदाच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये उघडकीस आला आहे. तर त्याचं कारण हे सौरभ चंद्राकरचं लग्न ठरलं होतं. त्यानं युएईमध्ये लग्न केलं असून त्यासाठी त्यानं तब्बल 200 कोटी खर्च केले होते. सौरभचं संपूर्ण कुटुंब हे नांदेडवरून युएईला प्रायव्हेट जेटनं आले होते. त्या प्रकरणानंतर तो ईडीच्या रडारवर आला होता. त्यानंतर ईडीनं अनेक सेलिब्रिटी मॅनेजर्सना मुंबई आणि दिल्लीत समन्स बजावलं. त्यातून ई़डीनं 2.50 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.