छोटी परी मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज; `या` सिनेमात वर्णी
‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने रसिकांना नव्याने येणार आहे. बहुप्रतीक्षित अशा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली होती. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे...’, ‘बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त देश एकमेकांशी न बोलणारे असतील…’, अशा अनेक टीका-टोमणे-टिप्पण्यांना सामोरी जाणारी स्त्रीशक्ती अलीकडे रुपेरी पडद्यावर धमाल करते आहे. त्याचाच पुनःप्रत्यय ‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने रसिकांना नव्याने येणार आहे. बहुप्रतीक्षित अशा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली होती. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत ही नावेच केवळ ‘नाच गं घुमा’ नेमका काय व कसा असेल, याची कल्पना देवून जातात. या नावांवरून चित्रपट महिलांची एक कथा असेल याचा अंदाज येतोच पण ही नावे एवढी उत्तुंग आहेत की, काहीतरी भन्नाट आपल्यासमोर येणार याची खूणगाठ प्रेक्षक बांधून टाकतो. या नावांच्या जोडीला मग स्वप्नील जोशी आणि परेश मोकाशी यांची नावे जोडली की दर्जेदार निर्मितीची हमी मिळते. हे दोघे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.
मात्र आता या सिनेमा एका अशा बाल कलाकाराचं नाव समोर येतंय.जे ऐकून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून तुम्हा सगळ्यांची लाडकी, परी आहे. म्हणजेच मायरा वायकुळ . नुकतीच मायराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,
''Myra’s First Marathi Movie May 2024 स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच ! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत...‘नाच गं घुमा’! मे महिन्यात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.. ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’.