काश्मिर, शिमला, कुल्लू मनालीला टक्कर देतात महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे; गुलाबी थंडीत प्लान करा रोमॅंटिक टूर

Winter Season : महाराष्ट्रातील या ठिकाणी गुलाबी थंडीचा आनंद लुटता येईल.

| Nov 15, 2024, 23:47 PM IST

Winter Season Places In Maharashtra :  गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.  अनेक जण थंडीत व्हेकेशनचा बेत आखतात. काश्मिर, शिमला, कुल्लू मनाली जायची अनेकांची इच्छा असते. मात्र, कधी कधी ते शक्य होत नाही.  महाराष्ट्रातील या थंड हवेच्या ठिकाणी रोमँटिक टूर प्लान करता येऊ शकते. 

1/9

राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. या गुलाबी थंडीत अनेक जण ट्रीपचा प्लान बनवतात.  महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे काश्मिर, शिमला, कुल्लू मनालीला टक्कर देतात.   

2/9

महाराष्ट्रातील या ठिकांवर अगदी कमी बजेटमध्ये रोमँटिक ट्रीपचा प्लान करता येईल.

3/9

भंडारदरा

भंडारदरा हे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे.  

4/9

आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. डोंगर-दर्याा, जंगल, धबधबे, समुद्र पर्यटकांना मोहित करुन टाकतात.  

5/9

गगनबावडा

कोल्हापुरातील गगनबावडा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिलस्टेशन आहे. इथल्या थंडगार आणि अल्हाददायी वातावरण मन प्रसन्न करते. 

6/9

लोणावळा खंडाळा

लोणावळा खंडाळा हे पुणे आणि मुंबईकरांचे आवडते डेस्टिनेशन आहे. शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणांना भेट दिल्यावर मूड रिफ्रेश होतो.

7/9

महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि गर्द झाडी अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे अनुभववता येते.

8/9

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मुंबई शहरापासून अगदी जवळ असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान अतिशय सुंदर आहे.   

9/9

 महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणे फिरताना शिमला, कुल्लू मनाली, दार्जिलिंगचा फिल येईल