मुंबई : Salman Khan's lawyer receives death threat from Lawrence Bishnoi gang : अभिनेता सलमान खान याच्या वकिलाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर वकीलांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याचे वकील एच सारस्वत यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. पत्रात म्हटले आहे की, वकील सिद्धू मूसवालाच्या नशिबी आले तेच तुमच्या वाट्याला येईल, असे या पत्रात म्हटले आहे. या धमकीप्रकरणी सलमान खानच्या वकीलांना पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर वकीलांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आम्ही या धमकीची चौकशी करत आहोत, जोधपूर पोलिसांनी सांगितले.


यापूर्वी 14 जून रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला अटक करण्यास परवानगी दिली होती. सिद्धू मूसवाला यांची 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली होती. 


पंजाबमध्ये नव्याने स्थापन झालेल्या भगवंत मान सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्यानंतर ही घटना घडली. उल्लेखनीय म्हणजे, गायक गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात दाखल झाला होता. त्यांनी मानसा जिल्ह्यातून निवडणूकही लढवली होती पण आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा 63323 मतांनी पराभव केला होता.


ज्या दिवशी 28 वर्षीय गायकाची मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्याच दिवशी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टमध्ये त्याच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा पंजाबी रॅपरच्या हत्येतील मुख्य संशयित टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते.


सलमान खान याचे वकील एच सारस्वत यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. पीटीआयनुसार, सलमानचे वकील सारस्वत यांनी आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, 3 जुलै रोजी वकिलांचे कार्यालय असलेल्या उच्च न्यायालयाच्या ज्युबली चेंबरच्या दारात धमकीचे पत्र सापडले. या पत्रात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार यांच्या नावाची आद्याक्षरे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सारस्वत यांचे सहाय्यक जितेंद्र प्रसाद यांना हे पत्र सापडले आणि त्यांनी तत्काळ वकिलांना याची माहिती दिली. सारस्वत हे सध्या परदेशात आहेत.