दुसरी अंगूरी भाभी देखील सोडणार मालिका
टीव्हीचा सुपरहिट कॉमेडी शो `भाभी जी घर पर है` मालिकेतील पहिली अंगूरी भाभी म्हणजे शिल्पा शिदें.
मुंबई : टीव्हीचा सुपरहिट कॉमेडी शो 'भाभी जी घर पर है' मालिकेतील पहिली अंगूरी भाभी म्हणजे शिल्पा शिदें.
आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. तिचा हा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीला येत आहे. तिला या शोमधून काढणारा प्रोड्यूसर विकास गुप्ता देखील आपल्याला बिग बॉसमध्ये पाहायला मिळत आहे. आता अशी चर्चा आहे की 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील दुसरी म्हणजे नवी अंगूरी भाभी देखील हा शो सोडून जाण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रे आता ही भूमिका साकारत आहे. लवकरच शुभांगी या मालिकेला बाय - बाय करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
नवी अंगूरी भाभी का सोडणार मालिका?
नवी भाभीजी शुभांगी अत्रे हिचं ही मालिका सोडण्यामागचं कारण वेगळंच आहे. तिचा निर्मात्यांशी वाद झालेला नाही. ती राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ती एका राजकीय कार्यक्रमात सहभागी झाली होती. अर्थात अद्याप तिच्या राजकारण प्रवेशावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण तिचं मालिका सोडण्यामागचं हेच कारण असावं असा अंदाज लावला जात आहे.
शिल्पा शिंदेने मालिका सोडल्यावर तिची रिप्लेसमेंट शोधणं निर्मात्यांना कठीण होऊन बसलं होतं. पण शुभांगीने या भूमिकेत जीव ओतला. प्रेक्षकांनीही तिला अंगुरी भाभीच्या भूमिकेत स्वीकारलं. आता पुन्हा तिची रिप्लेसमेंट शोधण्याचं आव्हान निर्मात्यांपुढे आहे.