Shreyas Talpade : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा फक्त मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय असतो. त्याचे लाखो चाहते आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात होते. इचकंच नाही तर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यादिवशी दिवसभर तो शूटिंग करत होता. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर त्वरीत त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. आता तो स्थिरावत असताना सगळीकडे असं कशामुळे झालं याविषयी चर्चा सुरु आहे. त्यावरून आता लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्यानं वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाकारांच्या कामाविषयी वक्तव्य केलं आहे. अजिंक्यनं ही मुलाखत रेडिओ सिटीला दिली होती. या मुलाखतीत त्यानं खुलासा केला की श्रेयस दादासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायला हवी. मी दादाला खूप मानतो. तो आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. आपण मनोरंजन क्षेत्रात आहोत, त्यामुळे आपलं पण मनोरंजन होतंच असं नाही. जसे परदेशात कामाचे तास ठरवून दिले आहेत, त्याचे नियम आहेत, तसेच आपल्याकडे पण हवेत. 12 तासाचे 14 तास होतात... जास्त वेळ काम केलं तर त्याचे पैसे मिळतात. पण, आपल्याकडे कलाकार आणि टेक्निकल टीममध्ये पण बेभानपणा जाणवतो. अभिनय हे उत्कंटतेनं करण्याचंच काम आहे. पण, तिथं कुठेतरी बांध असावा असं मला वाटतं. कारण शेवटी आपणही माणूसच आहोत.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


श्रेयस तळपदे हा लवकरच 'वेलमक टू जंगल' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाच्या सेटवरच गुरुवारी श्रेयसनं अॅक्श सीन शूट केले. याशिवाय दिवसभर तो इथे सेटवरच होता. जोपर्यंत श्रेयस सेटवर होता तोपर्यंत तो ठीक होता. त्यानंतर जेव्हा तो घरी गेला तेव्हा अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. 


हेही वाचा : अल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली


दरम्यान, त्याच्या आरोग्यावर बोलताना बॉबी एका मुलाखतीत म्हणाला की, 'मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिटं नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे तो लवकर बरा होऊन घरी परतेल एवढीच प्रार्थना. तो स्टार कलाकार आहे. तो लवकर बरा व्हावा, एवढीच अपेक्षा.'