अल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली

Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुननं पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला थेट दिला नकार; 'पुष्पा 2' चित्रपटासाठी होती ही खास ऑफर

दिक्षा पाटील | Updated: Dec 16, 2023, 02:10 PM IST
अल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली title=
(Photo Credit : Social Media)

Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. या सगळ्यात आता माहिती समोर आली आहे की अल्लू अर्जुननं दारूच्या जाहिरातीसाठी नकार दिला आहे. त्या ब्रँडची इच्छा होती की जेव्हा पण पुष्पा चित्रपटात धुम्रपान करेल किंवा तंबाकू खाईल तेव्हा ते सगळं स्क्रिनवर दाखवण्यात यावं. त्यासाठी त्या ब्रॅंडनं निर्मात्यांना तब्बल 10 कोटींची ऑफर देखील दिली होती. 

'गुल्टे' नं दिलेल्या रिपोर्टनुसार, या ब्रॅंडनं चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटातील ते सीन दाखवण्यासाठी तब्बल 10 कोटींची ऑफर दिली होती. मात्र, अल्लू अर्जुननं याला असं म्हणतं नकार दिला की तो अशा कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू इच्छीत नाही. अल्लू अर्जुननं कोणत्याही जाहिरातीला नकार देण्याची ही पहिली वेळ नाही. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर एका तंबाकूच्या ब्रँडनं छोट्या पडद्यासाठी जाहिरात करण्यासाठी खूप मोठी रक्कम देण्याचे सांगितलं होतं. मात्र, अल्लू अर्जुननं त्या ऑफरला नकार दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पुष्पा' विषयी बोलायचे झाले तर सुकुमारनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये तो चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटाची पटकथा ही लाल चंदनाच्या तस्करीवर आधारीत आहे. अल्लू अर्जुनला त्याच्या या चित्रपटाच्या भूमिकेसाठी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला. 

हेही वाचा : 10 वर्षांच्या AbRam नं दिली शाहरुख खानची सिग्नेचर पोज; शाळेतील कार्यक्रमाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चा फर्स्ट लूकचं पोस्टर शेअर केलं होतं. त्यात त्यानं साडी नेसली होती आणि त्याचा चेहरा हा निळ्या आणि लाल रंगानं पेंट करण्यात आला होता. त्यानं बांगड्या, दागिने आणि त्याचसोबत नोज रिंग आणि झुमके घातले होते. त्यानंतर फहद फासिलच्या लूकचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. आता चाहता रश्मिका मंदानाच्या पोस्टरची प्रतिक्षा होत आहे. या सगळ्यात सई पल्लवी देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सगळ्यात आधी असं म्हटलं जात होतं की हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.