Shilpa Shetty on Tomato Price : सध्या बाजारात भाज्यांचे दर पाहिलेत तर सगळ्यांना धक्का बसतोय. त्यात टॉमेटोचे दर तर 150 रुपये किलो आहे. त्यातही नागपुरात टॉमेटोचे दर हे 200 रुपये आहेत. वाढत्या भाजी पाल्याच्या दरानं सगळ्यांना महिन्याचा बजेट बिघडला आहे. पण हा बजेट फक्त सर्वसाधारण व्यक्तीचा नाही तर सेलिब्रिटींचाही बिघडला आहे. त्यांच्याही महिन्याच्या बजेटवर याचा परिणाम होत असल्याचं बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं काही दिवसांपूर्वी सांगितले होते. अशात आता त्याच्या मागोमाग बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील बोलताना दिसते. शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर वाढते टॉमेटोचे दर पाहता एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, शिल्पा शेट्टीचा हा मजेशीर व्हिडीओ असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा शेट्टीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी कोणत्या मोठ्या मॉलमध्ये असल्याचे दिसत येत आहे. येथे शिल्पा भाजी घेत असताना टॉमेटो घेत आहे. व्हिडीओत शिल्पानं क्रिम रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा ही टॉमेटो उचलताना दिसते. टॉमेटो उचलल्यानंतर शिल्पा त्याला गालाला लावणार तितक्यात धडकन तिच्या या चित्रपटातील डायलॉग बॅकग्राऊंडला ऐकायला येत आहे. ‘खबरदार, जो मुझे छूने की कोशिश की. किस हक से तुमने मुझे छुआ. तुम्हारा कोई हक नहीं है मुझ पर.’ हा डायलॉग बॅकग्राऊंडला ऐकायला येतोय. त्यावेळी शिल्पा बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवत काही हावभाव देखील देते. अखेर शिल्पा तिच्या हातात असलेला तो टॉमेटो पुन्हा रॅकवर ठेवून देते. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं कॅप्शन दिलं आहे की 'टॉमेटोची वाढती किंमत पाहता माझी धडकन वाढत आहे.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : भल्लालदेवनंतर आता 'या' भयानक रुपात दिसणार राणा दग्गुबाती


'धडकन' या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी या दोघांनी एकत्र काम केले होते. शिल्पाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मॅडम हे टॉमेटो तर तुझ्या दारू पेक्षा स्वस्त आहेत. महागाईचा परिणाम हा फक्त गरीब आणि मिडल क्लास लोकांवर पडतो तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांवर नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काहीही, तुमच्यासाठी तर सोन्याचे टॉमेटो देखील स्वस्त आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे टॉमेटो आहेत मला कॅप्शन वाचून कळलं आधी मला वाटलं की सफरचंद आहे.' याआधी सुनील शेट्टीला देखील टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर प्रतिक्रिया दिल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. अनेक नेत्यांनी त्याच्यावर टीका केली होती.