Naga Chaitanya पासून विभक्त झाल्यानंतर Samantha चा मोठा निर्णय
दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी नुकतीच सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली.
मुंबई : दक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी शनिवारी लग्नाच्या चार वर्षानंतर सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली. टॉलीवूडचा सुपरस्टार आणि नागा चैतन्यच्या वडिलांनीही त्यांच्या घटस्फोटाला 'दुर्दैवी' असं वर्णन करणारी एक पोस्ट शेअर केली. आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपलं नाव बदलून सामंथा असं ठेवलं आहे. जरी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम बायोमध्ये तिचं पूर्ण नाव लिहिलं नाही.
सामंथाने तिचं नाव सामंथा अक्किनेनी वरून बदलून सामंथा रूथ प्रभू असं ठेवलं आहे. काही काळापासून, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात गोष्टी ठीक होत नव्हत्या. त्याचवेळी, दरम्यान घटस्फोटाच्या बातम्या सतत समोर येत होत्या. असं म्हटलं जात की, दोघेही लवकरच घटस्फोटाचा निर्णय घेऊ शकतात. त्याचवेळी, शनिवारी, दोघांनीही हे अहवाल बरोबर सिद्ध केलं. यानंतर, सामंथाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना देखील सूचित केलं की, दोघांनी त्यांचे मार्ग वेगळे केले आहेत.
सामंथाने उचललं हे मोठं पाऊल
इंस्टाग्रामवर घटस्फोटाची माहिती दिल्यानंतर सामंथामे पोस्टचा कमेंट सेक्शन बंद केला. आता कोणीही सामंथाच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कमेंट बॉक्स बंद करण्याचं कारण या नात्याबद्दल यापुढे बोलू नका असं सांगितले जात आहे. सामंथा स्वतःच्या मार्गाने गेली आहे आणि आता तिला नागा चैतन्यापासून घटस्फोटाबद्दल बोलायचं नाही. तत्पूर्वी, घटस्फोटाबद्दल माहिती देताना, सामंथा म्हणाली की, तिला यापुढे या नात्याला पुढे न्यायचं नाही.