मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची प्रत्येक गोष्ट चर्चेत असणार. अशात बंगाली फिल्म अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जाहां यांनी काही दिवसांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर बाळाला जन्म दिल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या. शिवाय त्याच्या पतीने हे बाळ माझं नाही असं देखील सांगितलं. दरम्यान लग्नानंतर नुसरत जाहां आणि अभिनेता यशदास गुप्ता यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं. नुसरत यांच्या डिलिव्हरी दरम्यान यशदास गुप्ता त्यांच्यासोबत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात बाळाचा बाबा कोण? असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसरत जाहां यांना विचारला जात आहे. यावेळी नुसरत सिंगल मदर म्हणून बाळाचा सांभाळ करणार असल्याचं समोर येत आहे. दरम्यान नुसरत यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



'तुम्ही सल्ला घेत नसलेल्या लोकांकडून होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करा...' फोटो पोस्ट करत क्रेडीट म्हणून 'डॉडी' असं लिहिलं आहे. पण नुसरत यांच्या फोटो आणि कॅप्शनमुळे त्यांना पुन्हा ट्रोल केलं जात आहे. 


काही दिवसांपूर्वीच नुसरत यांनी बाळाला जन्म दिला. ज्यानंतर यशनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आई आणि बाळ सुखरुप असल्याचं सांगितलं होतं. नुसरकतला एकिकडून बाळाच्या जन्मानिमित्त शुभेच्छा दिल्या जात असतानाच दुसरीकडे तिच्या वैवाहिक आयुष्यातील वाढणारा गुंताही सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


2019 मध्ये नुसरत यांनी व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केलं होतं. ज्यानंतर विशेष विवाह कायद्याइंतर्गत हे नातं वैध नसल्याचा मुद्दा त्यांनी प्रकाशात आणला. आम्ही केव्हाच विभक्त झालो होतो. पण, मी त्याबाबत वाच्यता केली नव्हती. मला खासगी आयुष्यातील गोष्टी अशा उघडकीस आणायला आवडत नाहीत, असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, नुसरत यांचे सर्व आरोप त्यांच्या पतीकडून फेटाळण्यात आले होते.