Siddhaanth Vir Surryavanshi Death: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (siddhaanth vir surryavanshi ) यानं वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धांतच्या अचानक निरोप घेतल्यामुळे चाहतेच नाही तर सगळेच निराश झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार जिममध्ये वर्क आऊट (Heart attack during workout) करत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेने अनेकांना धक्का बसला. सिद्धांतच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीत शांतता आहे, तर कुटुंब आणि जवळच्या मित्रांना या काळात स्वतःला सांभाळणे कठीण जात आहे. दरम्यान, सिद्धांतच्या मृत्यूनंतर सिद्धांतच्या पत्नीने सोशल मीडियावर अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी पाहता पाहता व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सिद्धांतच्या पत्नीने तिच्या हृदयाची स्थिती सांगितली आहे. (After the death of Siddhant Suryavanshi his wife emotional post went viral nz)



अलेसिया राऊतची भावनिक पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धांतची पत्नी अलेसिया राऊतने इंस्टाग्रामवर लिहिले- 'मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी जिवंत असेपर्यंत तुझ्यावर प्रेम करेन. 24 फेब्रुवारी 2017 चा माझा पहिला फोटो.... या दिवसापासून तुला नेहमी माझ्या चेहऱ्यावर हास्य पाहायचे आहे..आयुष्याचा आनंद लुटत आहे. तु नेहमी म्हणायचा की जेवण वेळेवर खा. बिनधास्त माझा हात धरून मला सदैव साथ देणारी एकमेव व्यक्ती होतीस असं तिनं त्या पोस्ट मध्ये स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.


 



 


हे ही वाचा - बॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?



प्रेमाचा खरा अर्थ 


अॅलेसियाने पुढे लिहिले- 'मी तुमच्याशी लहान मुलासारखे वागू लागले. नेहमी तुझं अटेशंन मिळावं, तुझे स्मित, तुझ्या डोळ्यातील प्रेम आणि तुझी काळजी घेणारा स्वभाव नेहमीच वेगळा होता. तू एक महान मुलगा, मोठा भाऊ, तुझ्या मुलांसाठी प्रेमळ पिता, प्रेमळ पती, प्रेमळ मित्र आहेस. मला माहित आहे की तू नेहमी मला देवदूताप्रमाणे मार्गदर्शन करशील. तु सध्या सर्वात आनंदी ठिकाणी आहेस. तुझ्यावर प्रेम आहे… तू मला प्रेमाचा खरा अर्थ सांगितलास.


हे ही वाचा - SRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या



हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


11 नोव्हेंबर रोजी सिद्धांत सूर्यवंशी यांना जिममध्ये असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्यावर उपचार करण्यात आले आणि काही वेळाने अभिनेत्याला मृत घोषित करण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी मुंबईतील सांताक्रूझ येथे सिद्धांत सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 



 


हे ही वाचा - स्मिता पाटील अशा करायच्या न्यूज अँकरिंग, तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का



जीममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका


सिद्धांत वीर सुर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi) यांच्या आधी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju shrivastav) आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) यांचा जीममध्ये व्यायाम (Heart attack during workout)  करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack)  निधन झाल्याची घटना घडली होती. तसेच असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्याबाबत अशीच घटना घडली आहे.