मुंबई : जगभरात कोरोनाच्या ऑमायक्रॉन व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. याच दरम्यान अनेकांना कोरोना नियमांचं पालन करत जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन घरीचं केलं. खासकरून बॉलिवूड स्टार्ससाठी ख्रिसमसचा सण नेहमीच खास असतो. कोरोनाच्या काळात बॉलीवूड स्टार्सने देखील सतर्कता आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून त्यांच्या ख्रिसमसचा आनंद घेतला. आमिर खाननेही त्याची मुलगी आयरा खान आणि तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ख्रिसमस साजरा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या आयरा खानने कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. याशिवाय वडील आमिर खानही एकत्र एन्जॉय करताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये आयरा आणि नुपूर ख्रिसमसच्या थीमला अनुसरून मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहेत. 



यादरम्यान आयरा तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना देखील दिसली. तर आमिर दुर्बिणीसोबत पोज देताना दिसत आहे. त्याच्या हातात गिफ्ट देखील आहेत. याशिवाय प्रत्येकाने एक ग्रुप फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची झलकही पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचे फोटो  तुफान व्हायरल होत आहेत.