मुंबई : अभिनेत्री निकीता रावलने नुकताचं एक धक्कादायक प्रसंग अनुभवला आहे. दिल्लीमध्ये दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत तिच्याकडून तब्बल 7 लाख रुपयांची लूट केली.  सदर घटना घडली, त्यावेळी ती घरी एकटीच होती. निकिताच्या सांगण्यानुसार तिला चोरांचा चेहराही दिसू शकला नाही, कारण त्यांनी यावेळी मास्क घातला होता. या घटनेदरम्यान बचाव करण्यासाठी तिने  स्वतःला कपाटात बंद केलं. 'पिंकव्हिला'च्या माध्यमातून निकीताने घडला प्रकार सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकीता म्हणाली, 'मी अद्यापही या घटनेतून बाहेर आलेली नाही. मी आता जिवंत आहे यावर देखील माझा विश्वास बसत नाही. मी खरंच स्वतःला एका कपाटात बंद केलं होतं. ' सदर घटना घडली तेव्हा जवळपास 10 वाजले असतील असं देखील निकीताने सांगितलं. दरम्यान ते माझ्यावर बलात्कार तर करणार नाही ना? अशी भिती देखील निकीताला सतावत होती. 


'ते मला मारून टाकतील असा विचार सतत मनात येत होता. ते माझं सर्व सामान घेवून गेले. तरी देखील मला भिती सतावत होती ते माझा बलात्कार तर करणार नाहीत ना? घडल्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मी मुंबईत आली. कारण मला दिल्लीत सुरक्षित वाटत नव्हतं.' असा धक्कादायक खुलासा निकीता रावलने केला. 


कोण आहे निकिता रावल? 
निकिता मुळची मुंबईची राहणारी आहे. 2007 मध्ये 'मिस्टर हॉट मिस्टर कूल' आणि 2009 मध्ये 'द हीरो-अभिमन्यु' मध्ये तिनं काम केलं आहे. अभिनेता अरशद वारसी याच्या आगामी 'रोटी कपड़ा और रोमांस' या चित्रपटातूनही ती झळकणार आहे. 


कलाविश्वातील या कामाव्यतिरिक्त ती आस्था फाऊंडेशन नामक एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. सध्या मात्र निकितापुढं मोठा अडचणीचा प्रसंग उभा राहिला असून, ती यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.