मुंबई : साऊथचा सुपरस्टार यश सध्या त्याच्या 'KGF 2' चित्रपटात व्यस्त आहे. त्याचा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीत आता यशच्या चित्रपटाला यश मिळाल्याने कुटुंबियांना सरप्राईज मिळालं आहे. त्याच्या सरप्राईजचा फोटो त्याची पत्नी राधिका पंडित हिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जो नेटिझन्सना खूप आवडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशने दिलं सरप्राइज
चित्रपटाच्या यशानंतर यशने त्याला त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेन्ड करण्यासाठी सुट्टीवर नेलं आहे. या सुट्टीत हे कपल आपल्या दोन्ही मुलांसोबत निवांत टाईम स्पेंण्ड करताना दिसत आहे.



मिळत आहेत अशा प्रतिक्रिया 
राधिका पंडित अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. अनेक चाहत्यांनी या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी याला 'फॅमिली नंबर वन' म्हटलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, 'एवढा मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर आता फॅमिलीसोबत चिल करत आहे' तर अजून एकाने त्याचं वर्णन 'कम्प्लिट फॅमिली मॅन' असं केलं आहे. राधिका पंडितच्या या फोटोला  तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.