मुंबई : लग्नानंतर प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्याला ब्रेक लागतो हे तेवढंच खरं असलं तरी अभिनेत्री पुन्हा तितक्याचं जोमाने आणि उत्साहाने करियरची सुरूवात करतातय. असचं काही अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत देखील झालं आहे. अनुष्का आई झाल्यानंतर काही दिवस अभिनयापासून दूर होती. पण आता नव्या वर्षी अनुष्का नव्या तीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अनुष्का ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्राने सांगितले की,  'अनुष्का शर्माच्या चित्रपटांमध्ये पुनरागमनाचा अंदाज तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्री दोघांनीही वेळोवेळी लावला. पण आता अनुष्का तीन प्रीमियम प्रोजेक्ट्स साइन करण्यास तयार झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकी दोन नाट्यमय चित्रपट असतील आणि ओटीटी फिल्म असणार आहे.



रिपोर्ट्सनुसार, अनुष्काकडे तिच्या अष्टपैलू अभिनयाने बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त हीट चित्रपट देण्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांच्या घोषणेमुळे आगामी प्रोजेक्टची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. बॉलीवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांचा भाग होण्यासाठी अनुष्का नेहमीच उत्सुक असते. त्यामुळे अनुष्काला पुन्हा नव्या अंदाजात पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.