`आमचं एकमेकांवर खूप प्रेम...` सलमानबाबत हे काय बोलून गेली कतरिना
सलमान आणि कतरिनाला नेहमीच खूप पसंती मिळते. जशी ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आवडते तशीच ही जोडी प्रेक्षकांना खऱ्याही आयुष्यात आवडते. यापूर्वी मीडियामध्ये सलमान आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
मुंबई : नुकताच सलमान खानचा एक्शन-थ्रिलर 'टाइगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता. या सिनेमाची क्रेझ आपण प्रेक्षकांमध्ये पाहिलीच असेल. टायगर बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला. क्विचितच आपल्याला सिनेमाची अशी क्रेझ पायला मिळत असते. आत्ता पर्यंत 'टायगर 3' ने आत्तापर्यंत 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमात सलमान सोबत कतरिना मुख्य भूमिकेत दिसली होती. 'टायगर 3'मध्येही कतरिनाला खूप पसंती मिळाली आहे. सलमान आणि कतरिना ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. याआधीही या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी चाहत्यांची नेहमीच आवडती जोडी राहिली आहे.
सलमान आणि कतरिनाला नेहमीच खूप पसंती मिळते. जशी ही जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आवडते तशीच ही जोडी प्रेक्षकांना खऱ्याही आयुष्यात आवडते. यापूर्वी मीडियामध्ये सलमान आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता याबाबत बऱ्याच दिवसांनी कतरिनाने तिच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाने याबाबत खूप मोठा खुलासा केला आहे. फिल्मफेअरसोबतच्या संभाषणामध्ये कतरिनाने सलमानसोबतच्या तिच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबतचं तिचं नातं आणि त्याच्यासोबत काम करतानाच्या भावनांबद्दल खुलासा कतरिनाने केला आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली की, सलमानची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, गेल्या काही दिवसांत त्याचं प्रोफेशनल संबध खूप सुधारलं आहे. जेव्हा त्याने तिच्यासोबत पहिल्यांदा चित्रीकरण केलं तेव्हा तिने नवोदित म्हणून सुरुवात केली. ती म्हणाली की आज तिला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे.
पुढे कतरिनाने सांगितलं की, सलमान आणि मी एकमेकांसोबत कोणताही सीन करायला खूप कंफर्टेबल असतो. पुढे तिने खुलासा केला की, आमच्या दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. आणि मी स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे." कतरिनाचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. तर अनेकांनी कतरिनावर कौतुकाचा वर्षाव केलाय तर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.