मुंबई : आजकाल अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल चर्चा आहेत. अनेक सिनेमे रिलीजसाठी सज्ज असताना, अनेकांची शूटिंग सुरू आहे. दरम्यान, सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सलमान खानचा धमाकेदार लूक 'टायगर 3' च्या सेटवरून लीक झाला आहे. वाढलेली दाढी आणि पूर्णपणे वेगळ्या ड्रेससह अनेकांना सलमानला या लूकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे. सलमानचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सलमान खान आणि कतरिना कैफ टायगर 3 च्या शूटिंगसाठी रशियात आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे, तर याच दरम्यान सलमान खानचे पहिले चित्र उद्याच्या शेड्यूलमध्ये लीक होत आहे. इन्स्टाग्रामवर सलमान खानच्या एका फॅन पेजने रशियामधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.



ज्यात सलमान खान लांब केस आणि लाल दाढी असलेल्या लूकमध्ये दिसत आहे. शूटिंग क्रू आणि व्हॅनिटी व्हॅन देखील सलमान खानच्या आसपास दिसत आहे. या चित्रात सलमान खानने डोक्यावर लाल पट्टी बांधली आहे आणि जॅकेट घातलेला दिसत आहे. सलमान खानचा हा लूक व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.