मुंबई : बिग बॉस 11  ची विजेती शिल्पा शिंदेने हीना खानवर मात करत बिस बॉस चे विजेतेपद पटकावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर शिल्पा शिंदेचे चाहते सुखावले.
चाहत्यांच्या प्रेमाने सुखावलेल्या शिल्पानेदेखील ताबडतोब भार मानण्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला. 


 


भाभीजी ... मालिकेतून मिळाली लोकप्रियता  


'भाभीजी ...' या हिंदी मालिकेतून शिल्पा शिंदे हे नाव घराघरात पोहचले. तिने निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. निर्मात्यांनी हे आरोप फेटाळले आणि शिल्पा मालिकेपासून दूर झाली. 


 


भविष्यात काय करणार शिल्पा ? 


विजेतेपद मिळाल्यानंतर शिल्पा शिंदेने एक मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पासोबत 'भाभीजी..' या मालिकेदरम्यान जे घडलं त्यामुळे भविष्यात हिंदी मालिकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  हिंदुस्तान टाईम्स मध्ये प्रकाशित करण्यात  आलेल्या माहितीनुसार, शिल्पा हिंदी मालिकांऐवजी चित्रपटामध्ये काम करू इच्छिते. 


 
 शिल्पाने मानले फॅन्सचे आभार   


 सुरूवातीपासूनच शिल्पा शिंदेचे फॅन्स तिच्या पाठीशी ठाम उभे होते. ट्विटरही शिल्पा शिंदेच्या समर्थनार्थ अनेक हॅशटॅग ट्रेन्ड करण्यात आले होते. चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावलेल्या शिल्पा शिंदेनेही विजेतेपदाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच चाहत्यांचे आभार मानले आहेत.  ट्विटरवर शिल्पा शिंदेने खास व्हिडिओदेखील शेअर केला आहे.