मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर या पॉवर परफॉर्मर्सच्या अपारंपरिक जोडीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा चित्रपट, 'अवफा' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  आणि हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट एक विलक्षण थ्रिलर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधीर मिश्रा आणि अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलं आहे आणि एखाद्या अफवेमध्ये एखाद्याचं आयुष्य उलथापालथ करण्याची ताकद कशी असते याबद्दल बोलतो. सिरीयस मॅननंतर नवाजुद्दीनसोबत सुधीरची ही दुसरी आउटिंग आहे आणि ती आणखी एक शक्तिशाली आणि आकर्षक कथा आहे असं या ट्रेलरवरुन दिसतंय. या चित्रपटात सुमीत व्यास, टीजे भानू आणि शारिब हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


नवाजुद्दीन आणि भूमी पेडणेकर यांच्या 'अफवाह' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते चित्रपटाची झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. चाहत्यांची उत्सुकता आणि प्रतीक्षा शिगेला पोहचली होती. आता 'अफवाह'चा अधिकृत ट्रेलर रिलीज केला आहे. सुधीर मिश्रा लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचा रिलीज झालेला ट्रेलर चाहत्यांना एक धमाकेदार अनुभव देत आहे, ज्यामुळे कथा जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.


निर्माते अनुभव सिन्हा पुढे म्हणाले, "या महत्त्वाच्या चित्रपटासाठी सुधीरसोबत काम करणं हा एक समृद्ध अनुभव आहे. मला विश्वास आहे की, 'अफवाह' हा एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे. जो उच्च आशयाचे चित्रपट बनवण्याचे आमचं उद्दिष्ट पूर्ण करतो."



दिग्दर्शक सुधीर मिश्रा म्हणाले, "तुमचा पाठलाग करत असलेला राक्षस ही एक रक्तरंजित अफवा असेल तर? मुळात तुम्ही गोंधळलेले आहात कारण लपायला जागा नाही. अक्राळविक्राळ नेहमीच तुमच्यासमोर येईल. सर्वात वाईट म्हणजे कधी कधी राक्षस आकारात येतो. एखाद्या मित्राचा किंवा प्रियकराचा किंवा पालकांचा. जर हा एखाद्या चांगल्या थ्रिलरचा आधार नसेल, तर मला माहित नाही काय आहे! आमच्या काळातील माझी प्रतिक्रिया सादर करत आहे: अफवाह."


अफवाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केलं आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणेकर, शारीब हाश्मी, सुमित कौल, सुमीत व्यास, रॉकी रैना आणि टीजे भानू यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या बनारस मीडियावर्क्सच्या बॅनरखाली तयार केला आहे आणि 5 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.